Homeशहरपैश्याची मागणी करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न चालविल्याचा सुरज जाधव यांचा आरोप...

पैश्याची मागणी करुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न चालविल्याचा सुरज जाधव यांचा आरोप प्रकरणाची चौकशी करुन दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना झिंजे यांच्या विरोधात निवेदन

advertisement

अहमदनगर दि.५ जानेवारी-

दमदाटी करुन विनाकारण पैश्याची मागणी केल्याचा व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न हॉकर्स संघटनेचा अध्यक्ष संजय झिंजे करत असल्याचा आरोप सुरज जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी झिंजे व त्यांच्या नातेवाईकांकडून जीवितास धोका निर्माण झाले असल्याने घडलेल्या प्रकरणाची चौकशी करुन दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली

सुरज जाधव व त्यांच्या समवेत चितळे रोडवरील भाजी विक्रेते व परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.यावेळी सुरज जाधव,रविंद्र सावंत,पंकज नगरकर,शेखर तुंगार,सुर्यकांत कोल्हे, श्रीकांत म्याना,परेश घुगरे, राहुल नगरकर,अजय सब्बन,अजय पाचारे आदी उपस्थित होते.

सुरज जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,चितळे रोड येथील रहिवासी तसेच अहमदनगर हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे अनेक संघटनेचा अध्यक्ष म्हणून वावरतो. संघटनेचे नाव सांगून लोकांना दमदाटीने विनाकारण पैश्यांची मागणी करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून खोटे आरोप करुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न चालवले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ब्लॅकमेल करत आहे.यापूर्वी त्यांनी मला पाच लाख रुपयांची मागणी केली असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे.

माझी तोफखाना भागात वडापावची हातगाडी आहे. तोफखाना हद्दीत झिंजे इतर गोरगरीब हातगाडीवाले व भाजीपाला विक्रेत्यांकडून पैश्यांची मागणी करत असतो. माझ्या वडापावच्या गाडीवर पैसे मागण्यााकरिता आले असता,पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन खोट्या आरोपाचे सत्र त्यांनी चालवले आहे.27 डिसेंबर रोजी मी एका कार्यक्रमात गेलो असतांना झिंजे यांनी अनेक लोकांसमोर जाणीवपूर्वक धक्काबुक्की करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.तर जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हंटले आहे.
झिंजे यांच्या विरोधात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत असे निवेदन देता समयी रवींद्र सावंत यांनी बोलताना सांगितले.तसेच काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहे.त्यांचे चितळे रोड येथील हॉटेल हे सेटलमेंटचा अड्डाच बनला असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात झिंजे याने दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातून नाव वगळण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.यावेळी निवेदन ते त्यावेळी परिसरातील नागरिकांचा रोष दिसून येत होता.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular