अहमदनगर दि.१२ मार्च
अंकुश चत्तर खून प्रकरणी सध्या जेलमध्ये असलेल्या
स्वप्निल रोहिदास शिंदे याच्यावर मोका अन्वय कारवाई करण्यात आली असून मोक्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे पोलीस उद्या न्यायालयात मोक्का नुसार दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणार आहेत.
१५ जुलै रोजी रात्री अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे राजू फुलारी, अरुण पवार यांना अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास आधी तोफखाना पोलीस स्टेशन करीत असतानाच हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. स्वप्निल शिंदे याच्यावर याआधी अनेक गंभीर होण्याची नोंद असल्याने त्याच्या विरोधात मोका अन्वये कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव मंजूर झाला असून भाजपच्या नगरसेवकावर अखेर मोक्कका अंतर्गत कारवाई झाली आहे.
स्वप्निल शिंदे याला दहा जानेवारी रोजी मोका अंतर्गत पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. स्वप्निल शिंदे याच्या सह त्याच्या गँग वर मोक्का अंतर्गत प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता त्या प्रस्तावनाला अखेर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मंजुरी मिळाली असून अहमदनगर पोलीस उद्या न्यायालयात मोका कारवाईनुसार दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती अहमदनगर शहराचे डी वाय एस पी अमोल भारती यांनी दिली आहे.