Home शहर जलतरण तलावात लघुशंका केल्याने ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करून ठेका रद्द करावा...

जलतरण तलावात लघुशंका केल्याने ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करून ठेका रद्द करावा या मागणीसाठी शिव राष्ट्र सेनेचे जलसमाधी आंदोलन

अहमदनगर दि.११जानेवारी

अहमदनगर शहरातील वाडीया पार्क येथील जलतरण तलावात काही दिवसांपूर्वी जलतरण तलावामध्ये लघुशंका करत असतानाच एक फोटो व्हायरल झाला होता तसेच या ठिकाणी काही लोक मधपान पार्टी करत असल्याच्या धक्कादायक गोष्टी घडत असल्याचे लक्षात आल्या नंतर या प्रकाराबाबत शिवराष्ट्र सेनेने आवाज उठवला होता.या चुकीच्या गोष्टींबाबत जलतरण तलाव ज्या संस्थेला चालवण्यास दिला आहे त्या संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली होती तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे कृत्य केले आहे त्यांना कामावरून काढावे अशी मागणी करण्यात आली होती.


मात्र जिल्हा क्रीडा विभागाने शिवराष्ट्र सेनेने दिलेल्या निवेदनाला आणि त्यानंतर दिलेल्या स्मरण पत्राला केराची टोपी दाखवत जलतरण तलावाचा ठेका घेणाऱ्या ए.के. ग्रुप इंजिनियर या संस्थेवर कोणतीही कारवाई केली नव्हती. व्हायरल झालेल्या फोटो बाबत चौकशी करून संस्थेचा ठेका रद्द करावा अशी मागणी करून सुद्धा वर्षभरात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने अखेर आज शिवराष्ट्र सेनेच्या वतीने नगरच्या जलतरण तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.राष्ट्रीयअध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जलतरण तलावात उडी घेऊन आंदोलन केले. मात्र याबाबत जिल्हा जलसमाधीचे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना   देण्यात आले होते. मात्र या निवेदनाकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून आले होते. कारण जेव्हा शिवराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आंदोलन करण्यासाठी जलतरण तलावर आले असताना आणि संतोष नवसुपे यांनी पाण्यात उडी घेतली त्यावेळी फक्त त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस उपस्थित होते. त्यामुळे शिवराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया बाबत तीव्र नाराजी दर्शवली ज्यांच्या अधिपत्याखाली हे जलतरण तलाव सुरू आहे त्याच अधिकाऱ्यांना प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने शिवराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने जिल्हाक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले या जलतरण तलावर आल्यानंतर याबाबत लवकरच ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.येणाऱ्या काळात जलतरणपटू यांच्या रक्षणासाठी सदैव पाठीशी राहून न्याय मिळवून देणार अशी माहिती शिवराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी दिली आहे.

यावेळी शिवराष्ट्र सेनेचे दलित आघाडी अध्यक्ष  माजी नगरसेवक अनिल जी शेकटकर, बाबासाहेब करपे मनोज औशीकर, संजय सुगंधी ,गणेश शेकटकर, आनंद बगन राकेश सारवान ,सौ सुनिता चौहान ,सौ शितल चोटीले आदी पदाधिकारी उपस्थित होते

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version