Home Uncategorized “त्या” विशिष्ट समाजाने ‘ताबा’मारलेल्या जागा अखेर मोकळ्या… ताबा मारणाऱ्या त्या पडद्यामागच्या कलाकारांवर...

“त्या” विशिष्ट समाजाने ‘ताबा’मारलेल्या जागा अखेर मोकळ्या… ताबा मारणाऱ्या त्या पडद्यामागच्या कलाकारांवर कारवाई होण्याची गरज..

अहमदनगर दि.४ जुलै

अहमदनगर शहरात मोकळ्या जागा हेरून त्या जागेवर विशिष्ट समाजाला बस्तान बांधून देऊन ताबा मारण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते हे प्रकार करण्यास नगर शहरात एक टोळी कार्यरत झाली होती. या टोळीत अनेक व्हाईट कॉलर लोक सामील होते. जागा मालकाची इतंमभूत माहिती काढून त्या जागेवर ताबा मारून ती जागा बळकवण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणत सुरू होते. केडगाव,बुरुडगाव, तसेच शहरातील काही मोक्याच्या ठिकाणी तशा प्रकारे ताबे मारण्यात आले होते. ही बाब मूळ जागा मालकांच्या लक्षात येताच त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या समावेत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर निवेदन देऊन ताबे मारणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

पोलिसांनी याबाबत तातडीने पावले उचलून या प्रकाराची सविस्तर माहिती घेऊन मोकळ्या जागेवर मारलेल्या त्या विशिष्ट समाजाला हूसकाऊन लावले आहे आणि पोलिसांसमोर या ठिकाणी त्या व्यक्तींना कोणी ताबा मारायला लावले याबाबत सर्व माहिती दिली आहे. पोलिसांनी या ताबा मानणाऱ्या टोळीच्या लोकांना सध्या तरी समज देऊन सोडले असले तरी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version