अहमदनगर दि.१७ जुलै
अहमदनगर शहरातील ताबे मारणाऱ्या प्रकाराबद्दल आवाज महाराष्ट्र या वेब पोर्टल द्वारे मागील काही महिन्यांपासून अनेक भाग प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ताबे मारण्याची प्रक्रिया कशी आणि कोणत्या प्रकारे असते आणि कोण कोण या ताब्यामागे आहेत हे सर्व प्रकार आवाज महाराष्ट्राचा या वेब पोर्टलच्या माध्यमातून नगर शहरासह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम करण्यात आले. मात्र तरी अजूनही ताबे मारण्याचे प्रकार सुरूच आहेत या ताबे मारण्याच्या वर्चस्वातून अनेक वेळा दोन गटात वादावादी झाल्या आहेत. अनेक गरीब सर्वसामान्य नागरिक कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेल्या जागेवर गुंडांनी ताबे मारल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. पोलीस म्हणतात दिवाणी मॅटर आणि न्यायालयात वर्षानुवर्ष चालू असलेले प्रकरणे यामुळे माणूस हातबल होतो आणि गुंडांना कवडीमोल पैशात ही जागा विकून टाकतो ही वस्तुस्थिती आहे.
काही ठोळकेकर अशा प्रकारे तांबे मारतात की ज्याचा विचारही कुठे सर्वसामान्य माणसाला येऊ शकत नाही काही टोळके शहरातील उपनगरातील मोकळ्या जागांचा अभ्यास करतात जागा किती वर्षांपासून मोकळी आहे मालक येतो का नाही मालक शहरात राहतो का पर जिल्ह्यात राहतो का देशाबाहेर राहतो याची इत्तमभूत माहिती काढून झाल्यानंतर विविध तलाठी कार्यालयात हे टोळके त्या मोकळ्या प्लॉटची सर्वे नंबर प्लॉट नंबर घेऊन जातात त्यावरून मूळ मालकाचे नाव काढून तो मालक जिवंत आहे का याची खात्री केली जाते यामध्ये घेणारा आणि विकणारा या दोघांची माहिती हातात आल्यानंतर जर घेणारा आणि विकणारा दोन्ही माहीत असेल तर यावर जुन्या साठेकर अथवा खरेदीखत तयार करून त्यावर स्वतःचे नाव लावण्यासाठी पुन्हा शासकीय कार्यालयात पाठवले जातात ही एक नवीन साखळी आता समोर आली आहे. एका मोकळ्या प्लॉटचा घेणारा आणि देणारा मूळ मालक माहित झालेला आहे तरी इतर वारस देशातच राहत नसल्याने या मोकळ्या प्लॉटवर नाव लावण्यासाठीच एक प्रकरण सध्या एका तलाठी कार्यालयात पडून आहे. मात्र तलाठी यावर कारवाई करत नसल्याने त्याला त्यावर प्रचंड राजकीय दडपण आले आहे मात्र या राजकीय दडपणालाही या तलाठाने जुमानले नाही मात्र असेही प्रकार आता समोर येऊ लागली आहेत.या ताबे मारणाऱ्यांची संख्या नगर शहरात दिवसांनी दिवस वाढतच जाऊ लागली आहे.