अहिल्यानगर :दिनांक 3 जुलै
नवीन बिगरशेती कायद्यातील सुधारणा नियमनाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत संगमनेर तालुक्यातील तत्कालीन मंडलाधिकारी वैशाली मोरे, तलाठी कोमल तोरणे, तलाठी भीमराज काकड, तलाठी योगिता शिंदे-थोरात व महसूल सहायक वसंत वाघ अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

यामुळे महसूल विभागात एकच गोंधळ उडाला असून एकाच वेळी एवढे कर्मचारी आणि अधिकारी एकाच वेळी निलंबित होणे ही मोठी गोष्ट असून यामुळे संपूर्ण महसूल विभागात चांगलाच गोंधळ उडाला आहे.
याच प्रकारे बोल्हेगाव येथील एका जमिनी प्रकरणी नवनागापूर आणि निंबळक येथील असेच प्रकरण असून नवं नागापूर येथील तलाठ्यावर आणि मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे.
जमिनीचे मोठे तुकडे टिकवून त्यांचे एकत्रीकरण करून ठेवून शेतीयोग्य जमिनीचे संरक्षण करणे हा या कायद्याचा महत्त्वाचा हेतू आहे. त्यामुळे शासनाने रेड झोन, येलो झोन आणि ग्रीन झोन असे जमिनींचे विभाजन करून त्यानुसार त्यांच्या विभाजनावर नियम व अटी लागू केल्या होत्या.
तत्कालीन मंडलाधिकारी, तलाठी यांनी मात्र सर्व नियम ढाब्यावर बसवून रहिवासी प्रयोजन, प्रादेशिक विकास आराखडा तसेच ग्रीन झोनमध्ये जमिनीचे तुकडे केले, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे रेखांकन केले नाही, कोणत्याही प्रकारची मंजुरी घेतली नाही.