अहिल्यानगर दिनांक 4 जुलै
अहिल्या नगरच्या भिंगार छावणी मंडळात कुंपणच शेत होत असून नुकत्याच कंत्राटी पद्धतीने भरलेल्या 295 कामगारांचा ठेका भिंगार छावणी मंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने सफल इन्फस्ट्रचर या कंपनीच्या नावाने घेण्यात आला आहे. मात्र इतर कंपन्यांनी भरलेले अर्ज कसे बाद करता येतील आणि कशा प्रकारे सफल इन्फस्ट्रचर मदत करता येईल म्हणून खाल्ल्या मिठाला जागून छावणी मंडळातील दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीला मदत केली आहे.
भिंगार शहरातील साफसफाई करण्यासाठी कंत्राटी कामगार नेमण्यात आले असून हे कामगार घेण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र या निवेद्य मधून
सफल इन्फस्ट्रचर या कंपनीला कामगार पुरवण्याचा ठेका मिळाला. महेश कुलकर्णी यांनी हा ठेका घेतला असून यांना मदत करण्यासाठी गर , टे आणि रुडे यांनी छावणी मंडळ अंतर्गत मोठी मदत केली आहे. या ठेक्या मध्ये कर्मचारी सुद्धा झिरो पार्टनर असल्याची चर्चा सध्या भिंगार परिसरात सुरू आहे. याबाबत लवकरच काही सामाजिक कार्यकर्ते तक्रार दाखल करणार असून छावणी मंडळातील काही बोटावर मोजण्या इतके कर्मचारी अशा प्रकारे ठेकेदारांना मदत कडून दुसऱ्यांना ठेकांना मिळू न देता स्वतःच एखादी कंपनी आणून ठेका मिळून देण्याचे काम सध्या करत आहे.त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याने तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न उपस्थित होतोय. (क्रमशः)
वाचत रहा उद्या मालिकेत .. कोण आहे ते कर्मचारी कशाप्रकारे करतात मदत