Home Uncategorized आता नगर शहरातही मंदिरात जाताना ड्रेस कोड लागू

आता नगर शहरातही मंदिरात जाताना ड्रेस कोड लागू

अहमदनगर दि.३ जून

आता देवळात जाताना आपले कपडे कसे आहेत हे पाहूनच चला कारण आता अहमदनगर मध्ये मंदिरात जाताना ड्रेस कोड लागू झालाय

अहमदनगर शहरातील अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर, तुळजाभवानी माता मंदिर बुरानगर ,श्री शनि मारुती मंदिर माळीवाडा, शनि मारुती मंदिर दिल्ली गेट, शनि मारुती मंदिर झेंडीगेट,तुळजाभवानी माता मंदिर सबजेल चौक,श्री गणेश राधा कृष्ण मंदिर मार्केट यार्ड, श्रीराम मंदिर पवन नगर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वणी नगर,या मंदिरात उद्या पासून आणि अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरा मध्ये दोन महिन्याच्या आत वस्त्र सहिंता लागू होणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिलीय.

मंदिरात जाताना अंग प्रदर्शन होईल असे कपडे अशोभनीय कपडे, तोकडे कपडे, बर्मुडा , असे वस्त्र घालून मंदिरात प्रवेश करू नये

यावेळी अभय आगरकर,पंडितराव खरपुडे, अभिषेक भगत ,मिलिंद चावंडके, रामेश्वर भुकन हभप भोंग ताई आदी उपस्थित होते.

ड्रेस कोड लागू झालेले मंदिर

१. श्री भवानी माता मंदिर बुहानगर
२. श्री शनि मारुती मंदिर दिल्ली गेट
३. श्री शनि मारुती मंदिर माळीवाडा वेस
४. श्री शनि मारुती मंदिर झेंडी गेट
५. श्री गणेश राधाकृष्ण मंदिर मार्केट यार्ड
६. श्री विठ्ठल मंदिर पाईप लाईन रोड
७. श्री दत्त मंदिर पाईप लाईन रोड
८. श्रीराम मंदिर पवन नगर सावेडी
९. श्री भवानी माता मंदिर सब जेल चौक
१०. श्री रेणुका माता मंदिर केडगाव
११. श्रीराम मंदिर वडगाव गुप्ता
१२. श्री पावन हनुमान मंदिर वडगाव गुप्ता
१३. श्री संत बाबाजी बाबा मंदिर वडगाव गुप्ता
१४. श्री साईबाबा मंदिर केडगाव
१५. श्री खाकीदास बाबा मंदिर

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version