अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर
अहमदनगर शाहरतील काहो भागात जमीन हदरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.विशेषतः हा जमीन हदरण्याचा प्रकार केडगाव,कल्याण रोड आणि त्या भागातील सीना नदी काठच्या पट्ट्यात चांगलाच जाणवला या प्रकारामुळे नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर आले होते.सोमवारी रात्री हा प्रकार घडला आहे.
या आधी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांत एकच घबराट पसरली होती. राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात दोन ते तीन वेळा 10 ते 12 सेंकद भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते . अचानक जमीन हादरल्यामुळे घराच्या खिडक्या, दरवाजे व पत्रे वाजायला सुरुवात झाली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली होती.
अहमदनगर मध्ये जाणवलेल्या कालच्या धक्क्यांमध्ये आणि राहुरी मध्ये झालेल्या धक्कांमध्ये काहीसा फरक नव्हता राहुरी मध्ये हे धक्के जाणवले ते कारण राहुरी परिसरात सुमारे 117% पर्जन्यमान झाले आहे पाण्याची भूजल पातळी वाढलेली असून, पाण्याचा दबाव जमिनीतील मोकळ्या पोकळीकडे जात असल्याने पोकळीतील हवा बाहेर पडत असल्याने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू शकतात.