Home शहर विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची अलोट गर्दी, मात्र नंबर वरून वादावादी,रेंगाळलेली मिरवणूक , डिजेचा...

विसर्जन मिरवणुकीत नागरिकांची अलोट गर्दी, मात्र नंबर वरून वादावादी,रेंगाळलेली मिरवणूक , डिजेचा दणदणाट मिरवणूक बाराच्या ठोक्याला संपली

अहमदनगर दिनांक 10 सप्टेंबर

अहमदनगर शहरातील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे गणेश विसर्जन शुक्रवारी रात्री पार पडली दरवर्षीप्रमाणे अहमदनगर शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपती (vishal ganpati)बरोबर सहाच्या ठोक्याला दिल्लीगेट (dilligate)वेशीच्या बाहेर पडला. विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची आरती करण्यात आली होती. दोन वर्षानंतर आलेल्या गणेश उत्सवाला(Immersion procession )या वर्षी मोठा उत्साह जाणवत होता.श्री विशाल गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अहमदनगर शहरासह आसपासच्या गावातील नागरिकांनी नगर शहरातील रस्त्यांवर गर्दी केल्याने दोन वर्षानंतर अहमदनगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर महिला तरुण तरुणी आबालवृद्ध लहान मुले कुटुंबासह आल्याने मोठी गर्दी दिसून आली.

श्री विशाल गणपतीची मिरवणूक संपल्यानंतर मनाच्या बारा मंडळांची मिरवणूक मात्र रेंगाळली (Immersioncrawled) होती.तर यावर्षी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर अस्तित्वात आलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये नंबर लावण्यावरून किरकोळ वादावादी झाली होती. दरवर्षी निवडणूक मार्गावर 14 नंबर हा शहर शिवसेना या नावाने शिवसेना सहभाग घेत असते. मात्र यावर्षी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी याबाबत दावा केल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तरीही दाळमंडई मध्ये 13 नंबरला अचानक शिंदे गटाचे मंडळ आल्याने याला शिवसेनेच्या काही नेत्यांनी विरोध केल्यानंतर जवळपास एक दीड तास डाळ मंडईतच दोन्ही मंडळ उभे करण्यात आले होते. अखेर उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेला शिंदे गटाच्या पुढे जाऊ दिल्यानंतर निवडणुकीत सुरुवात झाली.

मात्र कालची मिरवणूक अत्यंत रेंगाळलेल्या परिस्थितीत होती गणपती मंडळांमध्ये मोठमोठे अंतर असल्यामुळे मिरवणूक पाहायला आलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. मानाच्या गणपतीचा एक नंबरचा गणपती नवी पेठ मध्ये असताना दुसरा नंबर चा गणपती हा थेट अर्बन बँकेजवळ तर बाकीचे सर्व गणपती कापड बाजारातच रेंगाळले होते. अखेर बाराच्या ठोक्याला मिरवणूक थांबवण्यात आली. मात्र अनेक मंडळ हे कापड बाजाराच्या आसपासच असल्याने नेता सुभाष चौक ,नवी पेठ मध्ये थांबलेल्या नागरिकांना या मंडळांच्या मिरवणूक पाहायला मिळाल्या नाहीत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता मात्र एकाही मंडळाला पोलिसांनी पुढे नेण्याबाबत बळजबरी न केल्याने मिरवणूक मोठ्या प्रमाणात रेंगाळली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version