Home शहर सर आता हे नको… माध्यमिक शिक्षक सोसायटीची सभा गोंधळात संपन्न

सर आता हे नको… माध्यमिक शिक्षक सोसायटीची सभा गोंधळात संपन्न

अहमदनगर दि.९ मे

सरांची सभा झाली आणि पुन्हा धिंगाणा झालाच कोरोना मुळे सर्व सभा बैठका बंद होत्या मात्र आता कोरोनाची साथ आटोक्यात आल्या नंतर दोन वर्षाच्या कालखंडानंतर माध्यमिक शिक्षक सोसायटीची सभा झाली

या सभेत पुन्हा मागचा इतिहास पुन्हा ताजा झाला असून अनेक विषयावर गरमागरम चर्चा झाली. अध्यक्ष सुरेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविकात मिसाळ यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती दिली सभेची सुरुवात जरी खेळीमेळीने झाली तरी याचा शेवट मात्र चांगलाच गदारोळात झाला नोकरभरती, जागा खरेदी,या विषयावर सत्ताधारी विरोधक आणि सदस्य यांच्या मध्ये चांगलीच चर्चा झाली.

मे च्या कडक उन्हात सभा का घेतली यावरून सुरू झालेला गोंधळात जागा खरेदीचा प्रश्न,नोकरभरतीत,कर्जाचा व्याजदर वाढवू नये व कर्जाचे हप्ते १८० वरून २०० करण्याची मागणी आणि डेटा सेंटर वर सभा संपली होती. या दरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळात माईक तोडण्यात आला धाव धाव झाली मात्र सत्ताधारी पक्षाने अवाजी मतदाने सर्व विषय मंजूर करून घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version