Home Uncategorized अखेर ड्रीम सिटी पुन्हा तहानलेली नगरसेवकांनी तोडले अनाधिकृत पाण्याचे कनेक्शन

अखेर ड्रीम सिटी पुन्हा तहानलेली नगरसेवकांनी तोडले अनाधिकृत पाण्याचे कनेक्शन

अहमदनगर दि.९ मे

अनेक दिवसापासून वादात असलेले नगर कल्याण रोड वरील ड्रीम सिटी या गृह प्रकल्पाच्या पाण्याचे मुख्य कनेक्शन केडगावच्या नगरसेवकांनी जेसीबीच्या साह्याने तोडले.

केडगावच्या हक्काचे पाणी ड्रीम सिटीला दिल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला होता या पाण्याच्या कनेक्शन वरून महापालिका सभागृहात आणि स्थायीसमितीच्या सभेतही मोठा गदारोळ झाला होता तात्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कारकिर्दीत ड्रीम सिटीला पाण्याचे कनेक्शन देण्यात आले होते यावेळी खूप विरोधही झाला होता.

केडगावमधील शिवसेना नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, संग्राम कोतकर यांनी हे कनेक्शन तोडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला अंतिम इशारा दिला होता मात्र मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

अखेरीस शनिवारी रात्री नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे यांच्यासह शिवसेनेचे हर्षवर्धन कोतकर यांच्या सह केडगाव मधील नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने कनेक्शन तोडले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version