Home Uncategorized भाडेकरू घालताना सावधान… करार संपल्या नंतर आपलीच वास्तू ताब्यात घेण्यासाठी कोर्ट कचेरी...

भाडेकरू घालताना सावधान… करार संपल्या नंतर आपलीच वास्तू ताब्यात घेण्यासाठी कोर्ट कचेरी पोलीस स्टेशनच्या आणि राजकीय नेत्यांच्या पायऱ्या चढण्याची वेळ येते

अहमदनगर दि.३० जुलै
ताबा हा विषय नगर मध्ये चांगलाच चर्चेचा झाला असून ताबा कशा प्रकारे मारला जातो या बाबतचे तपशील मागील भागात सविस्तरपणे मांडण्यात आला होता बळजबरीने दुसऱ्याच्या घरावर जमिनीवर दुकानांवर ताबा मारण्याचे प्रकार अजूनही सुरू आहे यामध्ये अजूनही एक प्रकार समोर येत असून भाडेकर म्हणून राहायचं आणि नंतर थेट ती जागा ताब्यात घ्यायची असेही काही प्रकार उघडकीस आले आहेत.

नगर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या नवी पेठ भागामध्ये असाच एक प्रकार सध्या समोर आला असून या ठिकाणी एक जुन्या इमारतीत भाडेकरी म्हणून असलेला आणि आता त्या जागेवर मालकी हक्क म्हणून जागा मालकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून खोटे गुन्हे दाखल करून जागेवर ताबा मिळवण्याचा प्रकार उघडकीस येत आहे.

याबाबत न्यायालयाने रीतसर निकाल दिल्या नंतरही बळजबरीने ताबा मारण्यासाठी काहीजण प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयीन लढाईत या प्रकरणात न्यायालयाने जागा मालकाकडून निकाल दिला आहे. इमारत अत्यंत जुनी असल्याने मोडकळी आली होती त्याबाबत महानगरपालिकेने वेळोवेळी ही मोडकळी आलेली इमारत पाडण्याबाबत नोटीसही दिली होती मात्र भाडेकरू खाली होत नसल्याने महानगरपालिकेला अडथळा येत होता अखेर जुनी झालेली इमारत पावसामुळे पडली मात्र तरीही आता या जमिनीचा काही भाग ताब्यात घेण्यासाठी काही लोक ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र न्यायालयाचा निकाल देऊनही पोलिसांकडे जाऊनही काही साध्य होत नसल्याने अखेर जागा मालकाला साम दाम दंड भेद याचा उपयोग करून जेरीस आणण्याचा प्रकार सध्या नगर शहरात सुरू आहे

त्यामुळे आता भाडेकरू घालतानाही जागा मालकांनी विचारपूर्वक भाडेकरू घालावा रीतसर कायदेशीर करार करूनच जागा भाड्याने देण्याची गरज आहे अन्यथा स्वतःची जागा पुन्हा मिळवण्यासाठी कोर्ट ,कचेरी, पोलीस स्टेशन ,राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पायऱ्या चढाव्या लागतात.

तर जेव्हा न्यायालय आणि पोलीस सत्याच्या बाजूने उभे राहतात तेव्हा भाडेकरू घर मालकाकडे अव्वाच्या सव्वा पैसे मागतात तेव्हाच घर,दुकान ,फ्लॅट खाली होते असेही प्रकार शहारत घडत आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version