अहमदनगर दि.३० डिसेंबर
सावेडी उपनगरामधील पाईपलाईन रोडवर असलेल्या यशोदानगर येथील नाथ किराणा स्टोअर्स दुकानाच्या वरच्या मजल्यावर नितिन अंगद सापते याच्याकडून चायना नायलॉन मांजाचे जवळपास 96 गट्टू तोफखाना पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
नायलॉन मांजा हा महाराष्ट्र शासनाने विक्रीस प्रतिबंध केला असून सुद्धा या मांजाची संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सर्रास खुल्या आम् विक्री होत असते. संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर हा मांजा मोठ्या प्रमाणात नगर शहरात आलेला असून याची विक्री सध्या जोरात सुरू आहे.
तोफखाना पोलिसांना नितीन सपाते हा मांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
सचिन रणशेवरे,पो.हे.कॉ जपे, अहमद इनामदार, पो.ना संदिप धामणे, पो.कॉ सतिष त्रिभुवन यांच्या पथकाने पाईपलाईन रोडवरील यशोदा नगर येथील
नाथ किराणा स्टोअर्स दुकानाच्या वरच्या मजल्यावर नितिन अंगद सापते याचा कडून विविध रंगाच्या 96 नालयलॉन मांज्याच्या रिळी जप्त केल्या असून या रेल्वेची किंमत जवळपास 73 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नागरिकांना आव्हान :-
नागरिकांनी नायलॉन मांज्याचा वापर करु नये त्यामुळे मानवी जिवितास तसेच पक्षांना, प्राण्यांना तिव्र इजा होण्याची दाट शक्यात आहे. तसेच अशा प्रकारच्या मांजाचा वापर केल्यामुळे गंभीर स्वरुपाचा अपघात घडुन मानवी जिवितास हानी पोहचु शकते त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करु नये. तसेच कोठे नायलॉन मांज्याची विक्री होत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आव्हान केलेले आहे.