HomeUncategorizedराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी लतिका पवार यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी लतिका पवार यांची नियुक्ती

advertisement

अहमदनगर दि.१ जानेवारी
अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या लतिका नंदकुमार पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड झाली असून नियुक्तीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष सौ रूपाली ताई चाकणकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकतेच देण्यात आले.

लतिका नंदकुमार पवार या राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक कार्यसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करून तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी एक वेगळं नातं निर्माण केला आहे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लतिका पवार यांच्या या निवडीचे शहरासह जिल्हाभरातून अनेकांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड झाल्यानंतर लतिका पवार यांनी सांगितले की पक्षाची ध्येय धोरणे हे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि सरकारचे चांगले उपक्रम सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम यापुढील काळात करणार असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे लतिका पवार यांनी सांगितलेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular