Homeक्राईमटोल वसुली साठी अजब प्रकार... बळजबरीने टोल नाक्यावरून गाड्या नेण्यासाठी गुंडांची नेमणूक.......

टोल वसुली साठी अजब प्रकार… बळजबरीने टोल नाक्यावरून गाड्या नेण्यासाठी गुंडांची नेमणूक…. चार चाकी छोट्या गाड्यांना टोल रोडवरून प्रवास करण्याची सक्ती प्रवास न केल्यास वाहन चालकांना मारहाणीचा प्रकार…

advertisement

अहिल्यानगर दि.20 डिसेंबर
अहिल्यानगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रिंग रोडवर टोल नाका सुरू झाला असून हा टोल नाका कल्याण रोड ते पुणे रोड या मधल्या रोडवर असून या टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू झाली आहे. पुण्यावरून शिर्डी कडे अथवा छत्रपती संभाजी नगर कडे जाण्यासाठी तसेच शिर्डी वरून अथवा छत्रपती संभाजी नगर वरून या बायपास वरून पुणे सोलापूर दौंड या रोड कडे जाण्यासाठी आता वाहनधारकांना टोल भरावा लागणार आहे.

मात्र आता या टोल वसुलीसाठी थेट वाहनधारकांनाच बळजबरीने या टोल कडे वळवण्याचा प्रकार सुरू झाला असून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे काही गुंडांकरवी पुणे रोडवर थांबून छोट्या वाहनधारकांना बळजबरीने या टोल रोडने जाण्यास भाग पाडले जात आहे असा प्रकार समोर आला असून पुण्यावरून आलेले वाहन थेट अहिल्यानगर मध्ये न जाता हे वाहन या टोल मार्गावरून कसे जाईल यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे लोक नगर पुणे रोडवरील बायपास चौकात उभा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

राहुरी येथील किशोर भाऊसाहेब शेडगे यांचा एक मालवाहू टेम्पो असून ते नगर शहराच्या आसपास असलेल्या गावातून मालवाहतूक करण्याचे काम करतात गुरुवारी संध्यकळी साडेसातच्या सुमारास किशोर शेडगे हे चास वरून माल घेऊन अहिल्यानगर मध्ये येत असताना केडगाव बायपास जवळ असणाऱ्या स्वीट होम जवळ रात्री पावणे आठ च्या सुमारास किशोर शेडगे यांना काही अनोळखी सर्वांनी हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा केला किशोर शेडगे यांनी रोडच्या कडेला गाडी थांबवली त्यावेळी त्या अनोळखी इसम इतर छोट्या मोठ्या गाड्या थांबवण्यासाठी रोडवर उभा राहून गाड्यांना हात करत होते मात्र गाडी का थांबवली हे न कळल्यामुळे किशोर शेडगे यांनी गाडी सुरू करून पुन्हा अहिल्यानगर कडे जाण्यासाठी निघाले असताना त्या ठिकाणी असलेल्या तीन अनोळखी लोकांनी किशोर शेडगे यांना गाडी सरळ न नेता बायपास रोडने घेऊन जा असे सांगितले यावर किशोर शेडगे यांनी माझे भाडे अहिल्यानगर शहरात सोडवायचे आहे त्यामुळे मला बायपास रोडनी जाण्याची गरज नाही त्यामुळे मी सरळ जाईल असे सांगून गाडी सुरू केली मात्र त्याचवेळी त्या अनोळखी लोकांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ सुरू केली यावर किशोर शेडगे यांनी त्यांना शिवीगाळ का करता असे विचारले असता त्यातील एक जण म्हणाला की तुला एकदा सांगितले ना केडगाव बायपास टोल नाका मार्गे जा तु आमचे ऐकत नाही का आमचे थांब तुला बघतोच असे म्हणुन त्यांनी किशोर शेडगे यांना लाथा बुक्यांनी मारहाण चालु केली त्यातील दोघांनी लाकडी दांडक्याने शेडगे यांच्या डाव्या पायावर जोराने मारुन त्यांना जखमी केले. मात्र अरडा ओरड जास्त झाल्याने रोड वरून जणाऱ्या काही गाड्या थांबताच मारहाण करणारे ते तीनही इसम तिथून पळून गेले.

हा प्रकार झाल्यामुळे घाबरलेल्या किशोर शेडगे यांना काही समजले नाही मात्र त्यांनी थेट कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला त्यानंतर किशोर शेडगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात त्या अज्ञात लोकांविरुद्ध विरुद्ध बी एन एस 118 (1),115,352,3 (5) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मात्र या प्रकरणातून अत्यंत गंभीर प्रकार समोर आला असून टोल नाका वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवले असल्याची घटना समोर आली आहे. टोल वसुली व्हावी यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बायपास चौकात उभा करून छोट्या गाड्यांना बळजबरीने टोल रोडवरून जाण्यास भाग पाडण्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकाराला कोणाचे अभय आहे हे गुंड कोणाचे आहेत आणि हे गुंड प्रवृत्तीचे लोक कोण पोसत आहे याबाबत आता पोलिसांनी सखोल तपास करून सर्व बाबी उघड करणे गरजेचे आहे.अशामुळे नगर शहरात येणाऱ्या बाहेरच्या लोकांनाही त्रास होऊ शकतो आणि टोल वसुलीसाठी ठेवलेल्या गुंड लोकांकडून काही अनुचित प्रकारही घडू शकतो त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular