Home Uncategorized शहरातील बस स्थानकासमोरील सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर उपअधीक्षक अमोल भारती...

शहरातील बस स्थानकासमोरील सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर उपअधीक्षक अमोल भारती उतरले रस्त्यावर..

अहिल्यानगर दिनांक 29 मे

शहरातील बसस्थानका बाहेर बेशिस्त वाहनांच्या पार्किंग मुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. तसेच शहरातील दिल्ली गेट कोठला स्टॅन्ड प्रोफेसर कॉलनी चौक भिस्तबाग चौक प्रेमदाम चौक या ठिकाणी वाहतुकीची सतत कोंडी होत असते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन अतिक्रमणे तातडीने काढावेत अशी मागणी केली होती. ज्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होईल ते अतिक्रमण कोणतीही मागचे पुढचे विचार न करता काढून टाकावे अशी आग्रही मागणी करण्यात आली होती.

त्याप्रमाणे आज शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी इंगळे आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माळीवाडा आणि पुणे बस स्थानकासमोरील दोन्ही बाजूकडील अतिक्रमणे काढण्याची कारवाई केली.

पुणे बस स्थानक आणि माळीवाडा बस स्थानकासमोर खाजगी बसेस तसेच कॅब चालक यांचे छोटे छोटे ऑफिस असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅव्हल बस प्रवासी घेण्यासाठी थांबत असल्यामुळे या ठिकाणी रोजच तासनतास वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच या ठिकाणी असलेल्या पानाच्या, चहाच्या आणि खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांमुळे त्या ठिकाणी येणारे ग्राहक त्यांच्या लागणाऱ्या गाड्या यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होण्यास मदत होत होती.
मात्र आज शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी स्वतः रस्त्यावर उतरत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकासह या परिसरातील अतिक्रमणे काढून टाकले आहेत. अतिक्रमण होऊ न देणे ही महापालिकेची जबाबदारी असून वाहतूक कोंडी होऊ न देणे ही शहर वाहतूक शाखेची जबाबदारी असते मात्र अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे इथून पुढे अतिक्रमण होणार नाही याची काळजी महानगरपालिकेने घेणे गरजेचे आहे.

पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी महानगरपालिकेचे अधिकारी, जेसीबी आणि अतिक्रमण करणाऱ्या दुकानांवर ताबडतोब कारवाई करण्याचा धडाका लावला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना समावेत घेत स्वतः उभा राहून जी अतिक्रमण आहेत ती विचारून घेऊन ताबडतोब जेसीबी द्वारे अतिक्रमण काढून रस्ते साफ करून घेण्याचे काम पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी आज केले.

याच प्रमाणे शहरातील विविध चौकात वाहतूक कोंडी रोजच होत आहे.मात्र याकडे शहर वाहतूक शाखेचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

बसस्थानकांच्या दोनशे मीटर परिसरात खासगी वाहने लावण्यास मनाई आहे. या परिसरात ‘नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आले असले तरी कुठेही या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आता तरी शहर वाहतूक शाखेने पुणे बस स्थानक आणि माळीवाडा बस स्थानक परिसरात पूर्णवेळ कर्मचारी नेमून या नो पार्किंग झोनच्या आदेशाची अंमलबजावणी करावी म्हणजे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होणार नाही असे मागणी नागरिकांकडून होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version