Home राज्य राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शिर्डी संस्थानच्या भाग्यश्री बानाईत आणि तुकाराम मुंढे...

राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शिर्डी संस्थानच्या भाग्यश्री बानाईत आणि तुकाराम मुंढे यांचा समावेश

मुंबई दि.२९ नोव्हेंबर
मंगळवारी सरकारनं राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या

भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली
सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ
नागपूर या पदावर. व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर. एस एस चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर. तुकाराम मुंढे, आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली नियुक्ती प्रतीक्षाधिन.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version