Home शहर शिवसेनेतील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट वेगवेगळे...

शिवसेनेतील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट वेगवेगळे असले तरी विसर्जन मिरवणुकीत आढळून आले हे साम्य

अहमदनगर दि.११ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील गणपती उत्सव (Ganapati Utsav) धूम धडाक्यात साजरा झाला दहा दिवस अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांमध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले गेले. तसेच शेवटच्या दिवशीही अनेक मंडळांनी डीजे लावून कार्यकर्त्यांच्या (Activists) उत्साहात भर पाडली सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) दिलेल्या आवाजाचे (voice) उल्लंघन करू नका असे अनेक वेळा पोलीस प्रशासनाने(Police Administration ) सांगूनही शेवटच्या दिवशी डीजे चा आवाज चांगलाच दणाणत होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये दोन गट पडले असून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) गट यांचा संघर्ष ठीक ठिकाणी राज्यात गणपती उत्सवातही पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे नगर शहरातही गणपती उत्सव दरम्यान शेवटच्या दिवशी नंबर वरून दोन्ही गटांमध्ये थोडाफार संघर्ष पाहायला मिळाला.

मात्र यामध्ये एक साम्य असे आढळून आले की उद्धव ठाकरे गटाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांचे फोटो झळकत होते. तर शिंदे गटाच्या गणपती मंडळाच्या समोर नाचणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचे नगर शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांचा फोटो शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होता. त्यामुळे अहमदनगर शहरात दोन गट झाले तरी अनिल राठोड यांच्या करिष्मा अजूनही कायम असून दोन्हीही गट माजी आमदार अनिल राठोड यांना मानणारे आहेत हे दिसून आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version