Home शहर अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळ्यास उध्दव ठाकरे गटाची दांडी तर शिंदे गटाचे...

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळ्यास उध्दव ठाकरे गटाची दांडी तर शिंदे गटाचे नेते व्यासपीठावर भाजपचे जेष्ठ नेते शेवटच्या रांगेत

अहमदनगर दि.१९ नोव्हेंबर

अहमदनगर शाहरतील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज नगर शहरातील शिल्पा गार्डन येथे देशाचे रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला.सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन झाले.अहमदनगर शहर हे पुढील काळात देशाच्या नकाशावर मुख्य शहर म्हणून येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं अनेक राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर शहराच्या जवळून जाणार असल्यामुळे अहमदनगर शहर हे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे मुख्य शहर म्हणून ओळखले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर नितीन गडकरी यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे खासदार सुजय विखे पाटील शिवसेनेचे शिंदे गटात सामील झालेले शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे,अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप माजी आमदार शिवाजी कर्डिले भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आमदार मोनिकाताई राजळे युवा नेते सुरेंद्र गांधी आदी भाजप आणि उद्धव ठाकरे सेनेचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले बाबुशेठ टायरवाले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मात्र नगर शहरातील उद्धव ठाकरे शिवसेना गटातील एकाही पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित नव्हता अथवा या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांची अनुउपस्थिती प्रामुख्याने जाणवत होती तर विशेष निमंत्रित लोकांना पास वाटप केल्याने या पास वाटपात गोंधळ झाल्याने अनेक भाजपचे जेष्ठ नेत्यांना शेवटच्या रांगेत बसावे लागले होते. अनेक वेळ यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची मिळत नसल्याने खुर्ची शोधण्यात त्यांचा वेळ गेला.

तर या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक दोन मधील अनेक नागरिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते यामध्ये तरुणांचे महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते या प्रभागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक असताना या प्रभागातून मोठ्या प्रमाणात तरुण महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने हा एक चर्चेचा विषय झाला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version