Home राजकारण नव्या चिन्हाची तयारी ठेवा …शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना अवाहन शिवसेने...

नव्या चिन्हाची तयारी ठेवा …शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना अवाहन शिवसेने कडून धनुष्यबाण जाणार ?

मुंबई दि.८ जुलै

‘नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. ते पाहाता पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील न राहाता शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं आहे.

१६ बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version