अहमदनगर दि.२४ एप्रिल
राज्यामध्ये सध्या उन्हाचा पारा चाळीशीच्या पाराझाला आहे. त्याचप्रमाणे राजकारणाचा पाराही आता चांगलाच तापला असून महाविकास आघाडी सध्या राज्यभर वज्रमूठ सभेचा सपाटा लावला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याही विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा होत असून या सर्वांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे तर शिवसेना शिंदे गट ही आक्रमक होत असून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमध्ये सध्या जोरदार वाक्य सुरू असून आणि उन्हाळ्यात या वाक युद्धामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
अहमदनगर शहरातही एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कार्यरत आहेत. अहमदनगर शहरात गेल्या तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्हा तालीम संघ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कुस्ती स्पर्धेच्या समारोपला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आले होते. महाविकास आघाडीचे सरकार सूडबुद्धीने पाडले या कारणांमुळे त्यांच्या आगमनाच्या आधी उद्धव ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार होता. यावेळी शिक्षक जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे, उपशहर प्रमुख अरुण झेंडे,कामगार सेनेचे गौरव ढोणे यांच्यासह शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी पोलीस हेडकॉटर जवळ जमा झाले होते. ठ मात्र पोलिसांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्या आधीच ताब्यात घेतले.
तर उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वागत हेलिपॅडवर करताना दिसून आले. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला त्यांनी स्पर्धेच्या ठिकाणी मंचावर उपस्थित लावली तेथेही त्यांनी सत्कार केला आणि कुस्ती स्पर्धेचा आनंदही लुटला मात्र एकाच दिवशी काही वेळातच उद्धव ठाकरे सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची वेगवेगळी भूमिका दिसल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.