HomeUncategorizedमहाविकास आघाडीच्या झंजावाताने पायाखालची वाळू सरकलेल्या माजी आमदार शिवाजीराव कर्डिले मतदारांना बळजबरीने...

महाविकास आघाडीच्या झंजावाताने पायाखालची वाळू सरकलेल्या माजी आमदार शिवाजीराव कर्डिले मतदारांना बळजबरीने सहलीला घेऊन नेत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

advertisement

अहमदनगर दि.२४ एप्रिल
बाजार समिती निवडणूक आता चांगलीच रंगात आली असून नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चांगलीच चुरस दिसून येत आहे. निवडणूक प्रचार सुरू झाला असून एकामेकाविरुद्ध दोन्हीही पॅनलने शड्डू ठोकले आहेत.
आता आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू असतानाच महाविकास आघाडी तर्फे आज जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची दहशत सुरू असून मतदारांना बळजबरीने सहलीला घेऊन जाण्याचा घाट घातला जात आहे तसेच जे मतदार सहलीला जात नाही त्यांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीने लावण्यात आला आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मतदारांचा भरभरून
प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माजी आमदार कर्डीले पुन्हा तालुक्यातील मतदारांवर दहशत सुरू केली आहे. मतदारांना बळजबरीने बुन्हाणनगर येथे बोलावून घेत त्यांना दमदाटी करून सहलीला पाठवले जात आहे. जर या मतदार व त्यांच्या कुटुंबाला काही झाले तर त्यास सर्वस्वी जबाबदार कर्डीले रहातील.नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार महाविकास आघाडीने वेळोवेळी उघड केलेला आहे. अनधिकृत पध्दतीने गाळे विक्रीतून, अनधिकृत बांधकामातून, आदि प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे. हे आता तालुक्यातील जनतेला आणि बाजार समिती मतदारांना
समजून चुकले आहे. मतदार या गोष्टीचा जाब सत्ताधारी पॅनल च्या उमेदवारांना विचारत आहेत. त्यामुळे
ते मतदारांवर दहशत करत आहेत.

नगर बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. ती भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या हातून वाचविण्यासाठी महाविकास आघाडी निवडणूकित उतरली आहे. आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, घनश्याम शेलार यांची साथ मिळाल्याने महाविकास आघाडीला मतदारांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी कर्डीले यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी आता तालुक्यात पुन्हा मतदारांवर दहशत, दडपशाही सुरू केली आहे. मतदारांना बळजबरीने बुन्हऱ्हाणनगर येथे नेले जात आहे. त्यांच्यावर दडपण टाकून त्यांची इच्छा नसताना त्यांना सहलीला पाठवले जात आहे. खुल्या वातावरणामध्ये निवडणूक का होऊ देत नाहीत अशा आशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना महाविकास आघाडीचे नेते आणि नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूकित उभे असलेले उमेदवार संदेश तुकाराम कार्ले, शरद मधुकर झोडगे ,महेंद्र प्रकाश शेळके,सोमनाथ रामदास पोकळे,संगीता ठोंबरे, भाऊसाहेब काळे,संदीप कर्डीले, राजेंद्र साहेबराव भगत, प्रवीण कोकाटे, रामदास भोर रामेश्वर सोलट यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular