Home क्राईम नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण आणखी एक आरोपी अटक… डी वाय एस...

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण आणखी एक आरोपी अटक… डी वाय एस पी अमोल भारती यांची कारवाई..

अहमदनगर दि.४ मार्च
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी अशोक कटारिया,अनिल कोठारी,राजेंद्र लुणिया ,प्रदिप पाटील
सी ए शंकर अंदानी हे न्यायालयीन कोठडीत असून. या प्रकारचा तपास मध्यंतरी डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे असताना त्यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली होती मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुन्हा नाशिक येथे बदली झाल्यानंतर तपास ररेंगळेलका काय अशी भीती ठेवीदारांना वाटत असतानाच आता हा तपास अहमदनगर शहराचे डीवायएसपी अमोल भारती यांच्याकडे आला असून त्यांनी या प्रकारात आता अविनाश प्रभाकर वैकर या आरोपीस अटक केली असून आज त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.


अर्बन बँकेच्या 291 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत बँकेतील अधिकारी आणि संचालक अटक झाले होते मात्र आता या घोटाळ्यात कर्जदारही अटकेत आहेत. तर काही कर्जदारांचे माहिती पोलिसांना भेटली असून लवकरच त्यांनाही अटक करण्याची कारवाई सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे त्यामुळे आता ज्या कर्जदारांनी खोटे कागदपत्र देऊन कर्ज घेतले आहेत अशा कर्जदारांवर आर्थिक गुन्हे शाखेची नजर असणार आहे. या प्रकरणात एकूण १०५ आरोपी असून बरच आरोपी अटकेच्या भीतीने फरार झालेली आहेत.

नगर शहरातील रासने नगर भागात राहणाऱ्या अविनाश प्रभाकर वैकर याला शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने अटक केली असून या पथकात पीएसआय निसार शेख, महिला पीएसआय मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुयोग सुपेकर, महेश मगर, हेमंत खंडागळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली भागवत, पोलीस नाईक योगेश घोडके, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश क्षिरसागर यांचा समावेश होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version