अहिल्यानगर
अर्बन बँक घोटाळा प्रकरणी माजी संचालक राजेंद्र
गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात 150
कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तत्कालीन
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार
कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. त्यात
291 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आला होता.
याप्रकरणी वारंवार नोटिसा देऊनही
चौकशीला हजर राहत नसल्याने विशेष पोलिस
तपास पथकाने बँकेचे माजी संचालक मनीष साठे यांना २६ जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते
त्यानंतर त्यांची पोलीस कस्टडीमध्ये रवानगी झाली होती पोलीस तपास झाल्यानंतर मनीष साठे हे न्यायालयीन कोठडीत होते. या आधी त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर औरंगाबाद हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला असून आरोपींच्या वतीने एडवोकेट राहुल कर्पे आणि एडवोकेट महेश तवले यांनी काम पाहिले.
दहा महिन्यानंतर आता मनेष साठे तुरुंगातून बाहेर येणार आहेत.