अहमदनगर दि .१५ फेब्रुवारी
नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी सीए व माजी तज्ज्ञ
संचालक शंकर अंदानी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकर अंदानी याला अटक केल्यानंतर आज न्यायालयात नेण्यात आले होते. न्यायालयाने शंकर अंदणी यास ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.२० फेब्रुवारी पर्यंत तो पोलीस कस्टडीत राहणार आहे. आज न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी बाजू मांडली.
या प्रकरणात एकूण १०५ आरोपी असून, यापैकी माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी यास अटक
करण्यात आली आहे. नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अध्यक्षांसह दोन संचालकांना अटक
करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई
केली. आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर मिटके यांनी नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्याच्या तपासाला
प्राधान्य दिले आहे.
आज न्यायालयात आरोपीला हजर केले त्यावेळी बँकेचे ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच बँक बचाव मोहिमेचे सदस्यही या ठिकाणी उपस्थित होते.