पाथर्डी: दि.२५ फेब्रुवारी
मनोज जरांगेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टिका केल्यानंतर पाथर्डी शहरात नाऱ्या राणे यांचा मराठा कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळला.गुरुवारी दुपारी सकल मराठा कार्यकर्त्यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा पेटवून राणे यांचा निषेध व्यक्त केला.
नारायण राणे मुर्दाबाद..कोंबडी चोर मुर्दाबाद बेताल वक्तव्य करणाऱ्या राणेचा निषेध अशी जोरदार घोषणाबाजी करून पुतळा पेटवून देण्यात आला.नारायण राणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे टीका केल्याने तमाम सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नारायण राणे व त्यांच्या दोन मुले हे सातत्याने जरांगे यांच्यावर टीका करतात यापुढे त्यांनी बेताल वक्तव्य केल्यास त्यांना जशास तसे आम्ही उत्तर देऊ असा इशारा मराठा कार्यकर्त्यांनी दिला आहे.