अहमदनगर दि.५ डिसेंबर
परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को. ऑप.
क्रे. सोसा. लिमीटेड शाखा जामखेड जि. अहमदनगर या
मल्टीस्टेट सोसायटीचे संचालकांनी यातील ठेवीदार व गुंतवणुकदार यांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवुन
त्यांना सोसायटीचे बचत खाते, आर. डी, एफ.डी. मुदतठेव खात्यामध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडुन
गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केलेल्या रककमेची मुदत पुर्ती नंतर तिचा परतावा न देता त्यांची अफरातफर
करुन आर्थिक फसवणुक केली आहे.
त्यावरून जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.I
२५९/२०१८ भा.द.वि.क.४२०,४०६,४०९,४६७,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण
अधिनियिम (वित्तीय आस्थापना) १९९९ (MPID) चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल असुन मा. पोलीस
अधीक्षक सो.अ.नगर यांचे आदेशान्वये सदरचा गुन्हा पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर
येथे वर्ग झालेला आहे व सध्या सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव आर्थिक
गुन्हे शाखा, अहमदनगर हे करीत आहेत.
तरी सदर सोसायटीचे जामखेड शाखेमध्ये गुंतवणुक केलेल्या साक्षीदार / गुंतवणुकदार यांनी त्याचे
कडे असलेल्या गुंतवणुकी बाबतचे कागदपत्रासह सदर गुन्हयाचे तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा कार्यालय
अहमदनगर येथे उपस्थित राहावे असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक कमलाकर जाधव यांनी केले आहे.