Homeजिल्हायुवा मतदार नोंदणीसाठी शिक्षकाचा अनोखा फॅशन मॉडेलिंग "युवारा"उपक्रम मतदारदूत डॉ. बागुल यांचा...

युवा मतदार नोंदणीसाठी शिक्षकाचा अनोखा फॅशन मॉडेलिंग “युवारा”उपक्रम मतदारदूत डॉ. बागुल यांचा उपक्रम लोकशाहीचे सौंदर्य वाढवेल-जिल्हाधिकारी भोसले

advertisement

अहमदनगर-दि.५ डिसेंबर
       मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय,मुंबई,महाराष्ट्रच्या वतीने 9 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर2022 या कालावधीत मतदार नोंदणीसाठीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम – 2023 राबविला जात आहे.तसेच आधारकार्डची मतदानकार्डाशी लिंक करण्याची मोहीम देखील चालू आहे.हे औचित्य साधून येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित प्रयोगशील शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी मतदार जनजागृतीच्या विविध 1000 पोस्टरसह विविध हजारो ड्रेस परिधान करून फॅशन-मॉडेलिंगच्या माध्यमातून अनोखे फोटोसेशन केलेल्या “युवारा” या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.
     “युवारा उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवमतदारांना लोकशाही प्रक्रिया,निवडणूक मतदार नोंदणी व मतदान जनजागृती या त्रिसूत्रीकडे आकर्षित करण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.अशा उपक्रमांच्या माध्यमातून लोकशाहीचे सौंदर्य अजून समृद्ध होण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन भोसले यांनी केले.
     यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र पाटील(उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी),रवींद्र ठाकूर(जिल्हा माहिती अधिकारी),सुदाम बटुळे (कार्यक्रम अधिकारी,आकाशवाणी)तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.गेल्या दहा वर्षांपासून मतदारदूत म्हणून व सध्या बी.एल.ओ.म्हणून देखील डॉ.बागूल काम करीत आहेत. 
    “युवा हा शब्द उलट वाचल्यास वायू होतो आणि वायू म्हणजे वारा,तारुण्याचे उपयोजन मतदार नोंदणी व 100% मतदान करून देशाच्या प्रगतीसाठी झाले पाहिजे.युवकांनी देखील आपल्या सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून या उपक्रमात सहभागी होऊन मतदार जनजागृतीचे पोस्टर्स मॉडेलिंग फोटोसेशन च्या माध्यमातून प्रसिद्ध करावेत”असे प्रतिपादन डॉ.बागूल यांनी केले
     मॉडेल माजिद शेख,ओंकार ढेकणे(वेशभूषा),गायत्री गुंडपाटील(मेकअप),सुजित सौदागर(फोटोग्राफी),स्वप्निल बोत्रे(केशभूषा),साहील मुळे व नितीन भोसले (ग्राफिक एडिटिंग)आदिंनी डॉ. बागुल यांना या उपक्रमासाठी सहकार्य केले.उमेश पाटील (तहसीलदार),अशोक कडूस(स्विप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी ),सर्व स्वीप समिती सदस्य,चंद्रशेखर शितोळे (तहसीलदार),प्रशांत गोसावी,शंकर रोडे,माधव गायकवाड (नायब तहसीलदार),छाया काळे,भूषण मेढे,निसार काझी आदींचे मार्गदर्शन व सहकार्य डॉ.बागुल यांना लाभले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular