अहमदनगर – प्रभाग क्रमांक ८ मधील सावेडी गांव ते बालिकाश्रम रोड परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सदर परिसरातील वाल मोठ्या प्रमाणात लिकेज आहे. त्यामुळे सदरील परिसरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तर काही भागात कायमस्वरूपी वाल सतत चालु असतात. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे परिसरातील नागरीकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. याचबरोबर विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. सदरील परिसरातील नागरीकांनी पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याबाबत माझ्याकडे वारंवार तक्रारी करत आहेत याचबरोबर खंडोबा मंदिर भागात पाणीपुरवठा करणारे नवीन पाईपलाईल टाकणे बाकी आहे.