HomeUncategorizedचोरून नळ कनेक्शन वापरत असलेल्या दोन मंगल कार्यालयांवर गुन्हा दाखल...

चोरून नळ कनेक्शन वापरत असलेल्या दोन मंगल कार्यालयांवर गुन्हा दाखल…

advertisement

अहिल्यानगर दिनांक फेब्रुवारी

नगर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार माजी नगरसेवक निखिल वारे यांनी उघडकीस आणला आहे. अहिल्या नगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा पाईपलाईन वरून चोरून नळ कनेक्शन घेऊन वापरत असलेल्या दोन मंगल कार्यालयांवर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी नळ कनेक्शन तोडून मंगल कार्यालयाच्या चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. नगर छत्रपतीसंभाजी नगर महामार्गावरील ताज लॉन आणि कवी जंग लॉन या दोन मंगल कार्यालयात पाण्याचे चोरून कनेक्शन घेऊन पाणीपुरवठा सुरू होता. याबाबत माजी नगरसेवक निखिल वारे यांनी महापालिकेत आयुक्तांसमोर ही बाब समोर आणली होती.

महानगरपालिकेने या तक्रारीची शहानिशा करून दोन्ही मंगल कार्यालयांवर कारवाई केली आहे. अनधिकृत घेतलेले नळ कनेक्शन तोडून या मंगल कार्यालयाचे मालक असलेल्या. मिर शफीउददीन मीर कमरोददीन कविजंग जहागिरदार.सय्यद महमंद अनिस महमंद इसहाक. सय्यद मझरुलहक्क इस्माईल. सय्यद महमंद अनिस. सय्यद परवेज महमंद शफी. या पाच जणांविरोधात तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनाधिकृत रित्या नळ कनेक्शन जोडुन शहर पाणी पुरवठा अत्यावश्यक सेवेत बाधा निर्माण करणे. शासकीय मालमत्तेस नुकसान करणे. विना परवाना नळ कनेक्शन जोडुन पाणी चोरुण महानगरपालिकेची अर्थिक नुकसान करणे. अशा विविध कारणाखाली तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये.
भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 ३२६(ब) 2, भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 ३२४(४) 3, भारतीय न्यायिक संहिता (BNS), 2023 ३२४(५), सलमान खान गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र हे पाणी आता किती दिवसांपासून हे दोन्ही मंगल कार्यालय वापरत होते. आणि कोणाच्या आशीर्वादाने वापरत होते. हेही समोर येणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीपट्टी भरून पाणी वापरतो. मात्र तरीही त्याला कमी दाबाने पाणी येते. मात्र अनाधिकृत नळ कनेक्शन घेऊन सर्रास पाण्याचा वापर या ठिकाणी सुरू असल्याचा दिसून आले. यामुळे महानगरपालिकेचा अनागोंदी कारभारही समोर आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular