Homeशहर10 वी 12 वीचे पेपर पोलिस अलर्ट मोडवर...खबरदार विनापरवाना आणि रात्री 10...

10 वी 12 वीचे पेपर पोलिस अलर्ट मोडवर…खबरदार विनापरवाना आणि रात्री 10 नंतर डिजे वाजवाल तर… डीजे मालक चालकांवर होणार गुन्हे दाखल…मंगल कार्यालय,लॉन मालक चालकांना नाही पोलिसांच्या नोटिसा…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 13 फेब्रुवारी

सध्या परीक्षांचा काळ सुरू असून बारावीची वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे तर येत्या काही काळात दहावीची वार्षिक परीक्षा सुरू होणार असल्यामुळे पोलिसांनी त्यांना मिळालेल्या भारतीय नागरीक सुरक्षा संहिता १६८ अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार शहरातील मंगल कार्यालय चालक, डीजे चालक तसेच रात्रीच्या लग्नासाठी उपलब्ध करून देणारे लॉन चालक-मालक यांना कोतवाली पोलिसांच्या वतीने नोटीसा पाठवण्यात आल्या असून सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार रात्री १०.०० ते सकाळी ०६. वाजेपर्यंत पावेतो ध्वनिक्षेपक वापरास बंदी असूनही काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत लग्न कार्यासाठी तसेच इतर कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय परिसरात डीजे चालकांना विनापरवानगी डीजे लावण्यासाठी मंगलकार्यालय/लॉन्सचे मालक परवानगी देतात यामुळे शालेय विदयार्थ्यांचे अभ्यासावर परिणाम होऊन वयोवृध्द व सर्व सामान्य नागरीकांना त्रास सहन करावा लागत असून याबाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात.

या करिता अहिल्यानगर शहरातील सर्व डीजे/चालक मालक यांना या नोटीस व्दारे सुचित करणेत येते कि. मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार रात्रौ १०.०० ते सकाळी ०६.०० वा. पावेतो ध्वनिक्षेपक वापरास बंदी असून देखिल आपण पोलीस प्रशासनाची पुर्व परवाणगी न घेता शहरातील वाहतुकीस आडथळा निर्माण होईल अशापध्दतीने शहरातील प्रमुख मार्गावरुन शुभ विवाह, हळद व इतर कार्यक्रम प्रसंगी डीजे डॉब्लो सिस्टिमचा कर्णकर्कश आवाजामध्ये वापर करुन ध्वनिप्रदुषण करत असल्याने निदर्शनास आलेले आहे. आपण, आम्ही दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करून डीजे/डॉब्ली सारखे वादय वाजवून शहरातील जेष्ठ नागरीक, आजारी व्यक्ति, सर्व सामान्य नागरीकांना व विदयार्थ्यांना त्रास होईल अशा पध्दतीने हॉस्पिटल, शाळा कॉलेजेस धार्मिक स्थळांचे जवळ कर्णकर्कश आवाजामध्ये हेतूपुरस्सरपणे ध्वनिक्षेपक चा वापर केल्यास व त्यावरुन अहिल्यानगर शहरातील शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरणेत येऊन डीजे मालक चालक, मंगलकार्यालयाचे मालक, जनरेटर वाहन मालक यांचेवर बीएनएसएस, ध्वनिप्रदुषण अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करुन सर्व ध्वनिक्षेपक साहित्य जप्त करणेत येईल अशी नोटीस शहरातील सर्व मंगल कार्यालय चालक-मालक तसेच डीजे चालक-मालक यांना कोतवाली पोलिसांनी बजावली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular