अहमदनगर दि.२४ ऑगस्ट
पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला आहे लग्नाची घटका जवळ येत असतानाच वधू वर गळ्यात हार घालण्याच्या तयारीत असतानाच पहिल्या बायकोने मुलासह एन्ट्री केल्याने लग्नात एकच गोंधळ उडाला आणि अखेर हे बेकायदेशीर लग्न रोखून नियोजित वराची वरात थेट पोलीस ठाण्यात गेली.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय महिलेला कळले की आपला पती अहमदनगर येथे जाऊन दुसरे लग्न थाटामाटात करत आहे ही माहिती कळल्यानंतर पत्नीने आपल्या आई-वडिलांसह आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले नगरमध्ये आल्यानंतर नगर मनमाड रोडवर असलेल्या एका हॉटेलचा पत्ता शोधत ती पत्नी बरोबर लग्न लागायच्या आधी काही मिनिटे लग्न लागण्याच्या ठिकाणी पोचली आणि तिथून पुढे या लग्नात चांगलाच राडा झाला पत्नीने आपल्या नवऱ्याच्या नियोजित वधूला चांगलेच चोपले अचानक झालेल्या या प्रहाराने वधू आणि वर चांगलेच गोंधळून गेले होते तर आलेल्या व्हारडी मंडळींना सुद्धा काय झाले हे समजत नव्हते तिथूनच कोणीतरी पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळाने तोफखाना पोलीस त्या ठिकाणी पोचले आणि सर्व वरात पोलीस स्टेशनला नेण्यात आली.
पोलीस स्टेशनला आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला असून कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता आणि एक मुलगा असताना सुद्धा आपल्या पतीने दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करून एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते मात्र आम्ही त्या ठिकाणी वेळेत पोहोचल्याने तो लग्न सोहळा थांबवण्यात आला मात्र माझ्या पतीने मला फसवून दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला असल्याबद्दल चा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे
तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये विशाल गोरखनाथ पवार यांच्याविरुद्ध भादवी 494 नुसार पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विशाल पवार हे जालना जिल्ह्यात राहणारे असून तसेच त्यांची होणारी नववधू ही सुद्धा जालना जिल्ह्यात राहणारी आहे मात्र दोघांच्या कुटुंबांनी जालना आणि छत्रपती संभाजी नगर सोडून अहमदनगर जिल्ह्यात लग्न करण्यामागचे कारण अखेर समोर आले असून पहिल्या पत्नीपासून लग्न लपवण्यासाठीच हे लग्न अहमदनगर मध्ये करण्याचा प्लॅन दोन्ही कुटुंबांनी आखला होता मात्र आकर पहिल्या पत्नीने येऊन आपल्या पतीच्या स्वप्नावर पाणी फिरवले आहे