Homeविशेषअहमदनगर मनपा सर्वच बाबतीत फेल... नगरकरांना सेवा देऊ न शकणाऱ्या महापालिकेचे कर्मचारी...

अहमदनगर मनपा सर्वच बाबतीत फेल… नगरकरांना सेवा देऊ न शकणाऱ्या महापालिकेचे कर्मचारी समस्यांच्या गर्तेत करतात काम ! महापालिका फक्त कर वसुलीसाठी अस्तित्वात आहे का ? काका शेळके

advertisement

अहमदनगर दि.२४ ऑगस्ट
अहमदनगर महनगर पालिकेला स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत मात्र हे पुरस्कार महापालिकेला कसे मिळतात आहेत मोठा प्रश्न आता उभा ठाकला असून महानगरपालिका नगरकरांना सेवा देण्यास असमर्थ ठरतं असतादे त्याचबरोबर आता महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ऑफिस मध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सर्वात जास्त महसुली उत्पन्न देणाऱ्या सावेडी उपनगर मधील सावित्रीबाई फुले संकुल परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या वसुली विभागाच्या आणि इतर विभागाच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या कार्यातील कर्मचारी आणि कार्यालयात आलेल्या नागरिकांसाठी स्वच्छतागृह असून नसल्यासारखे आहे. येथील स्वच्छतागृह फक्त शोभे पुरते असून या स्वच्छतागृहातून आउटलेटच काढले नसल्याने या परिसरात अत्यंत घाणेरडी दुर्गंधी पसरली असून या दुर्गंधी मध्ये आलेल्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे .

याच प्रमाणे प्रोफेसर कॉलनी मधील व्यापारी संकुलन मागील शौचालय सुद्धा अत्यंत घाणेरड्या परिस्थितीत असून या ठिकाणी एखादा व्यक्ती एक मिनिटापेक्षा जास्त उभे राहिला तर त्याला बक्षीस मिळेल अशी परिस्थिती आहे.

नगर शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या अनेक स्वच्छतागृहांची परिस्थिती अत्यंत घाणेरडी असून कापड बाजार सारख्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह महापालिका उभारू शकली नाही यावरूनच महानगरपालिका नगर यांच्या प्रश्नासाठी किती संवेदनशील आहे हे लक्षात येते.

महानगरपालिका फक्त नगरकरांकडून कर वसुली करता अस्तित्वात आहे का? बाकी प्रश्नासाठी महानगरपालिका का तत्परता दाखवत नाही महानगरपालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा दबाव नसल्यासारखी शहरातील परिस्थिती असून स्वच्छतागृहा प्रमाणेच रस्ते आणि इतर समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे असल्याचा आरोप शिवसेनेचे उप शहरप्रमुख काका शेळके यांनी केला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular