Home शहर ओढे नाले बुजवणाऱ्या बड्या धेंडावर कारवाई कधी ? मनपाचा नगर रचना विभाग...

ओढे नाले बुजवणाऱ्या बड्या धेंडावर कारवाई कधी ? मनपाचा नगर रचना विभाग झोपेत काम करतो का ? अनेक नैसर्गिक ओढे नाले बुजून उभारल्या आहेत इमारती

अहमदनगर दि.६ सप्टेंबर

नगर शहरातील सर्वसामान्य लोकांच्या जागेवर घरावर ताबा मारणाऱ्या नाठाळांना गुंडांना वठणीवर आणण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून ताबा ही मालिका सविस्तरपणे लावण्यात आली होती त्यानंतर ताबाखोरांची पळता भुई थोडी झाली असून अनेक ठिकाणी हे प्रकार थांबलेले आहेत. मात्र अजूनही काही ठिकाणी असे प्रकार सुरूच आहेत त्यानंतर आता नगर शहरातील भूखंड माफिया ज्यांनी शहरातील ओढे नाले बुजून प्लॉटिंग केले आहे अशा लोकांची पोल खोल करणारे आणि व महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी नवीन सादर चालू करतोय ..भूखंडाचे श्रीखंड 

काही दिवसांपूर्वी नगर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उपनगर परिसरात अनेक ठिकाणी पाणी घुसले. नागरिकांच्या घरातील साहित्यासह दुकानांमध्ये असलेल्या मालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ओढे व नाले बुजवून, त्यात पाइप टाकून मंजूर करण्यात आलेले ले आऊट, त्यावर झालेली बांधकामे यामुळेच उपनगर परिसरात पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले होते घरे दुकानांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते.

सावेडी उपनगर परिसरात अनेक ठिकाणी ओढे व नाले बुजवून, तसेच पाईप टाकून निर्माण करण्यात आलेले अडथळे कारवाई करून दूर करण्यात येणार आहेत. अशी घोषणा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केली आहे मात्र या कामाला अजून मुहूर्त मिळालेला नाही .

महानगरपालिकेच्या तत्कालीन नगरसेवकाने महापालिकेत एक मोठे पद घेऊन सी क्यू ए व्ही च्या कंपाउंड लगतच्या स्वतःच्या ले आउट साठी शेकडो वर्षापासून असलेल्या नैसर्गिक ओढ्याची दिशाच बदलली होती 30 ते 40 फूट खोल आणि 20 ते 25 फूट रुंदीचा नैसर्गिक नाला आता फक्त पाईप एवढा असून या ठिकाणी मोठमोठे बंगले झाले आहेत. स्वतःच्या पदाचा गैरवापर करून हा प्रकार झालेला असताना मात्र महानगरपालिकेचा नगर रचना विभाग याकडे डोळेझाक का करतो हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो

या ठिकाणी बुजवले ओढे नाले

राजमाता कॉलनी जवळ सिक्यईव्ही कंपाऊंड ला लागून मोठ्या ओढ्याची नाली करण्यात आली असून नरहरी नगर मध्ये ओढा बुजवले आहेत तर कुष्ठधाम रोड वरील नैसर्गिक ओढ्याला पाईप टाकल्यांर याठिकाणी पाणी रोड वर येते तसेच स्काय कोर्ट इमारतीजवळ ४०६ मीटर मीटर (पाइप टाकून), गजराज फॅक्टरीजवळ २७ मीटर (स्लॅब ड्रेन), अमोल विहार इमारतीजवळ ११ मीटर (पाइप टाकून), केडगाव सर्वे नंबर २०२ मध्ये १७६ मीटर (पाइप टाकून), मनकमोती कंपनीजवळ २१ मीटर (पाइप टाकून), श्रेया गार्डनजवळ (नाल्याचा प्रवाहच नाही), टाटा मोटर्स ते यश गार्डन हॉटेल जवळ ३०० मीटर (भूमिगत), पद्मावती मंदिराजवळ २५ मीटर (पाइप टाकून) आशीर्वाद लॉनमागे ११८ मीटर (पाइप टाकून),म्हाडा सोसायटीजवळ ११० मीटर (भूमिगत),केडगाव सर्वे नंबर १९९ मध्ये ११० मीटर (पाइप टाकून),

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version