Homeशहरअन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा तेवढाच गुन्हेगार, ताबा जमात समूळ नष्ट...

अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा तेवढाच गुन्हेगार, ताबा जमात समूळ नष्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही

advertisement

अहमदनगर दि.२२ मार्च (सुशील थोरात)

ताबा या सदराखाली नगर शहरातील वास्तव परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला असताना अत्यंत गंभीर परिस्थिती समोर आली आहे. ताबा प्रकारामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत हे वास्तव सत्य आमच्या समोर आले आहे ताबा फक्त मोकळ्या जमिनीवर नाही घर बंगले, रो हाऊसेस, दुकाने,फ्लॅट अशा ठिकाणी मारल्याचा समोर आले आहे. एवढेच नाही तर शहरातील अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनाही याचा मोठा त्रास जाणवत आहे मात्र कोर्ट काचेरीची झंजट नको म्हणून अनेक व्यावसायिक लाखो रुपयांना फ़सूनही पोलीस प्रशासनाकडे जात नाही हे सत्यही समोर आले आहे.

खरं पाहिलं तर अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच अन्याय सहन करणार गुन्हेगार ठरतो मात्र ताबा सदर चालू केल्यानंतर अन्याय का सहन केला जातो याची अनेक उदाहरणं नागरिकांनी पुराव्या सह आमच्याकडे सादर केले आहेत. पोलीस प्रशासना कडे गेल्यानंतर काही कारणांमुळे होणारी दिरंगाई तसेच गुंडांकडून होणारी धटिंगशाही आणि वेळेवर मदत न भेटल्यामुळे अखेर ताबा गुंडांसमोर पत्करावी लागणारी हार यामुळे अनेक दिग्गज व्यवसायिक हतबल झाले आहेत.

सावेडी उपनगरातील अशाच एका व्यावसायिकाला ताबा गुंडांकडून मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याच्या भल्या मोठ्या जागेवर गुंडांनी ताबा मारून त्याचे सुरू असलेले काम थांबविण्याचा प्रकार घडला होता मात्र या बांधकाम व्यावसायिकाला ना पोलिसांची साथ लाभली कोणत्या समाज संघटनेची साथ लाभली अखेर त्याने त्या गुंडा समोर शरणागती पत्करून काही जागा त्या गुंडाला देऊन टाकली याचे ताजे उदाहरण नगर शहरात घडले आहे.

नगर औरंगाबाद रोड वर अशाच एका भाईने ताबा मारून जागा बळकावली आहे जागा मालक रोज कागदपत्रे घेऊन नेत्यांकडे चक्कर मारतोय पण त्याला अजून कुठेच थारा मिळेना.

नगर शहारत असे प्रकार राजरोस सुरू आहेत नगर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील एका वस्तीमध्ये सुद्धा एका राजकीय पुढाऱ्याने भाड्याने घेतलेले घर खाली न करता ताबा मारून ठेवले आहे जेव्हा घर मालक घर खाली करण्याची विनंती करतो तेव्हा हा पुढारी अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावे घेऊन घर मालकालाच दमदाटी करून परत पाठवत असल्याची घटना याच नगर शहरात घडत आहे.

या घटना पोलीस प्रशासनाला माहीत नसतात असे नाही मात्र जो पर्यंत तक्रार येत नाही तो पर्यंत पोलीस कारवाई करत नाहीत. मात्र काही  गोष्टी निदर्शनास आल्यानंतर स्वतः पोलिसांनी फिर्यादी होणे गरजेचे आहे अन्यथा ही ताबा जमात भविष्यात पोलिसांना डोकेदुखी ठरू शकते.

पोलिसांनी ठरवले तर काहीही होऊ शकतं हे अनेक वेळा पोलिस कारवाईतून सिद्ध झाला आहे मागील काही काळात एक ताबा माफियाने चांगलाच धुमाकूळ घातला असताना पोलिसांनी त्याला तडीपार करून त्याची ताबा गुंड होण्याची हौस चांगलीच भागवली होती याचे उदाहरण नगरकरांना आहे.

ताबा प्रवृत्ती नगर शहरातून समूळ नष्ट करायची असेल तर सर्वसामान्य आणि अन्यायग्रस्त नागरिकांनी समोर येणे गरजेचे आहे. ताबा गुंडा बरोबर दोन हात करू शकणार नाही मात्र कायद्याने अशा गुंडांना धडा शिकवला जाऊ शकतो त्यासाठी वेळ लागेल पण एक ना एक दिवस ही ताबा गुंडांची जमात समूळ नष्ट होऊ शकते त्यासाठी फक्त अन्याय होणाऱ्या नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे.
क्रमश:

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular