Home राजकारण आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीला यश अभय योजने खाली थकीत मालमत्ता धारकांना...

आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीला यश अभय योजने खाली थकीत मालमत्ता धारकांना मिळणार दोन टक्के सूट, अभय योजनेचा मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा मनपा आयुक्त शंकर गोरे यांचे आवाहन

अहमदनगर प्रतिनधी –
अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिकेकडे पत्र देऊन शस्ती माफीची मागणी केली होती या मागणीला यश आले असून आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार महापालिकेने अभय योजने खाली ज्या मिळकतीधारकाकडे थकीत मालमत्ता करा वरील मागील व चालू दोन टक्के शस्तीची रक्कम आहे त्यांना १६ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये दोन टक्के सूट देण्यात येणार आहे या कालावधीमध्ये जी 2% शस्तीच्या रकमेची आकारणी झालेली आहे त्या रकमेवर सूट देण्यात येईल ही रक्कम सोडून उर्वरित रक्कम एकरकमी भरणे बंधनकारक राहणार आहे असे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी काढले आहेत .या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version