Homeराजकारणकर्जत नगरपंचायतीची निवडणूकच लै न्यारी.. उमेदवारांची सकाळी "या" पक्षाची उमेदवारी तर संध्याकाळी...

कर्जत नगरपंचायतीची निवडणूकच लै न्यारी.. उमेदवारांची सकाळी “या” पक्षाची उमेदवारी तर संध्याकाळी ‘त्या” पक्षाच्या दरबारी… कर्जत मधील ‘या’ फोटोची सध्या चांगली चर्चा ,आमदार रोहीत पवार रॉक तर माजी मंत्री राम शिंदे शॉक

advertisement

कर्जत -दि.१८ डिसेंबर सुथो
कर्जत नगरपंचायतीची निवडणुकी मध्ये रोज नवनवीन धक्के पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमुळे कर्जतकरांची चांगलीच करमणूक होत आहे.कारण कोण कधी कुठे कोणत्या पक्षात प्रवेश करेल याचा नेम नसल्याने कर्जतच्या चावडी चावडीवर सध्या याच विषयावर गप्पांचे फड रंगत आहेत.

 

ही निवडणूक सुरू झाली तेव्हा पासूनच राष्ट्रवादीने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली पहिल्या दिवशी भाजपच्या काही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या होम ग्राऊंडवरच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी धक्के द्यायला सुरुवात केली होती भाजपला धक्के पचवायला सुद्धा आमदार रोहित पवार वेळ देत नसल्याचे अनेक घडामोडींवरून दिसून येत आहे. भाजपच्या प्रभाग क्रमांक १४ च्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी अहमदनगर दक्षिण खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे यांनी जाहीर प्रचार सभा घेतली होती आणि त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत यात भाजपच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.अवघ्या बारा तासाच्या आत मध्ये हा धक्का राष्ट्रवादीने भाजपला दिल्यामुळे कर्जत मध्ये भाजप हवालदिल झाली आहे.

माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत उडी घेतली होती मात्र पहिल्या दिवसापासूनच भाजप बॅकफूटवर असून पुढे काय करावे हेही आता कार्यकर्त्यांना समजत नाही राष्ट्रवादीने भाजपला कर्जत मधून समूळ नष्ट करण्याचा चंगच बांधला काय असच या सर्व घडामोडींवरून दिसून येत आहे.सकाळी भाजपच्या मंचावर असलेल्या भाजपच्या प्रभाग क्रमांक १४ च्या उमेदवार शिबा सय्यद ह्या राष्ट्रवादीच्या मंचावर दिसल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार ताराबाई कुलथे यांना पाठींबा देत धनंजय मुंडे, काँग्रेसचे हार्दिक पटेल आणि आ रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. कर्जतमध्ये येथे मागील काही वर्षे माजी आमदार शिंदे यांचे मोठे वर्चस्व होते त्याच कर्जतमध्ये आता नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप हवालदिल झाला आहे याचे चित्र पाहायला मिळतंय.सुथो

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular