अहमदनगर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील जवळे या गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्याची घटना ऑक्टोबर महिन्यात घडली होती.याचा तपास अद्यापही लागलेला नाही. या घटनेनंतर जवळा ग्रामस्थ संतप्त झाले होते दहा दिवसानंतरही या घटनेचा तपास लागला नसल्यामुळे जावळे ग्रामस्थांनी या मुलीचा दशक्रिया विधी स्टँड समोरील रस्त्यावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय ग्रामस्थांनी मागे घेतला होता. या घटनेचा तपास अंतिम टप्प्यात आला असून लवकरच आरोपींना अटक करू असे पोलिसांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या घटनेचा तपास लागलेला नाही तर या घटनेनंतर या पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या चित्रा वाघ या २४ ऑक्टोबरला जवळा गावात आल्या होत्या आणि मदत म्हणून भाजप तर्फे एक लाख रुपयांचा धनादेश दिला होता.पीडीत मुलीच्या वडिलांनी हा धनादेध जवळा येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत आपल्या खात्यावर जमा केला होता त्या नुसार २६ नोव्हेंबरला बँकेच्या स्टेटमेंट नुसार एक लाख रुपये रक्कम त्या संबंधीत खात्यावर जमा झाली मात्र २९ नोव्हेंबर ला पुन्हा बँकेने ती रक्कम काढून घेतल्याचं दिसतंय.त्या मुळे आता ही चूक नेमकी कोणाची ज्या बँकेचा चेक पीडित कुटुंबीयांना दिला होता त्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे नव्हते का? किंवा बँकेकडून काही तांत्रिक चूक झाली याबाबत आता भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जवळे येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत ठिय्या मांडला आहे. ँकेने आम्हाला यावर लेखी पत्र द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी केली आहे. कारण चित्रा वाघ यांनी जो चेक दिला होता त्या बँकेच्या खात्यामधून चेक बाउन्स होणे शक्य नसल्याने ही चूक बँकेकडून झाली असेल तर तसे लेखी द्यावे अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.