Lअहिल्यानगर दिनांक १५ जुलै
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर कडे सध्या अनेक पालख्या रवाना होत आहेत लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत निघालेले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या शिरूर येथील श्री संत बहिणाबाई पायी दिंडी सोहळा पालखीचे अहिल्यानगर मध्ये आगमन झाले असून अहिल्यानगर मध्ये या दिंडीचे स्वागत शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख ॲड.स्वाती जाधव यांच्या कुटुंबीयांनी केले असून यानिमित्ताने या पालखीची सेवा ही करण्यात आली. दमून बघून आलेल्या वारकऱ्यांचे पायांची मालिश करणे, ॲक्युप्रेशर नैसर्गिक उपचार पद्धतीने उपचार करणे, याचबरोबर चहा, नाश्ता,पाण्याच्या बॉटल ,आदी सेवा दरवर्षी जाधव कुटुंबांतर्फे करण्यात येत असते.
या दिंडीची तिसरी पिढी वारसा चालवत आहेत श्री भागवताचार्य मधुराज महाराज मोगल देवगावकर यांच्या अधिपत्याखाली ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे त्यांचे पंजोबा ह भ प किसन महाराज मोगल हे आहेत. ही दिंडी देवगाव येथून प्रस्थान करते. तिचे आगमन अहिल्यानगरला १४ जुलै रोजी होते. त्यानंतर मजल दरमजल करत ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत असते.





