अहमदनगर दि.१० जुलै
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या परिक्षेत उप निरीक्षकपदी नगर शहरातील भिंगार येथील प्रतीक सुनील भिंगारदिवे याची निवड झाली आहे.(MPSC PSI Result) निकाल जाहीर होताच प्रतिकचे घर आनंदाने डोलू लागले. मित्र मंडळी आणि नातेवाईकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
त्यानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर MPSC परीक्षा क्रॅक केली आहे. त्याचे वडील अहमदनगर जिल्हा पोलिस दलात सहाय्यक फौजदार म्हणून सेवा बजावत आहेत सुनील भिंगारदिवे हे पोलीस मुख्यलायात असून तर आई घराचा डोलारा सांभाळत आहे. मुलाने शिकून अधिकारी व्हावी, अशी दोघांची इच्छा होती. ती आता त्यांच्या मुला पूर्ण केली आहे.
प्रतिक याने खूप कष्ट घेतलं. त्याचं फळ त्याला मिळालं अशी प्रतिक्रिया त्याच्या पालकानी व्यक्त केली. बारावीपर्यंत भिंगार हायस्कूल बारावीच्या पुढे नगर कॉलेज मध्ये प्रतिकचे शिक्षण झाले. पदवी प्राप्त झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली घरात पहिल्यापासूनच वडील पोलीस असल्याने आपणही खाकी वर्दी घालून मोठा अधिकारी म्हणून स्वप्न प्रतीक याने पाहिले होते. MPSC मधून अत्यंत चिकाटीनं त्यानं हे यश मिळवलं आहे. हे यश त्याच्या कुटुंबियांसह समस्त भिंगारकरांसाठी अभिमानस्पद असून या यशाबद्दल मित्र आणि नातेवाईकांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (MPSC PSI Result)