Homeजिल्हासंभावीत तिसऱ्या लाटे साठी जिल्हा प्रशासन सज्ज, मात्र लसीकरणाच्या बाबतीत नागरिकांची उदानसीता...

संभावीत तिसऱ्या लाटे साठी जिल्हा प्रशासन सज्ज, मात्र लसीकरणाच्या बाबतीत नागरिकांची उदानसीता काळजीत टाकणारी पहिली लस घेणारे ७५% तर दुसरी लस घेणाऱ्यांची टक्केवारी धक्कादायक जिल्हाधिकार्‍यांनी केले लस घेण्याचे आवहान

advertisement

अहमदनगर दि.११ डिसेंबर –
अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रोन साठी जिल्हा प्रशासन सज्ज असून येणाऱ्या तिसऱ्या लाट मध्ये दीडपट संख्या लक्षात घेता जिल्ह्यात ४५ हजार३३१ ही रुग्ण संख्या सर्वात जास्त असेल. त्या मध्ये ६५℅ रुग्णांनवर घरीच उपचार करण्यात येतील. जिल्ह्यात पंधरा हजार८६६ पर्यंत रुग्ण सापडले तरी त्याची विभागवारी करून शासकीय रुग्णालयात सात हजार ९३० आणि खाजगी रुग्णालयात सात हजार ९३० अशी रुग्णांची विभागवारी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील.जिल्ह्यात सध्या ४१२ व्हेंटिलेटर बेड असून त्या मध्ये शासकीय रुग्णालयात ३८८ इतके तर खाजगी रुग्णलयात ४१२ इतके बेड आहेत.तर लहान बालकांसाठी व्हेंटिलेटरचे ७१ बेड असून नॉनव्हेंटिलेटर २७० बेड आहेत तर ६७५ ऑक्सिजन बेड असून १३२७ जनरल बेड जिल्ह्यात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आत्ता पर्यंत ३ लाख ५७ हजार ६७८ रुग्ण सापडले आहेत.पहिल्या लाटेत ७५ हजार ८८१ तर दुसऱ्या लाटेत २ लाख ६९ हजार रुग्ण सापडले होते.मागील दहा दिवसात रुग्ण संख्या वाढली असून नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलं आहे.

जिल्ह्यात लसीकारणाचे ३६ लाखांचे उद्दिष्ट असून जिल्ह्यात आज पर्यंत दोन्ही डोस पूर्ण करणारे १३ लाख १५ हजार नागरीकांनी दोन्ही लस घेतल्या आहेत याची टक्केवारी फक्त ३६ असून पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २७ लाख १७ हजार म्हणजेच ७५% नागरीकांनी पहिली लस घेतली आहे. लसीकरणासाठी आता शिक्षकांची मदत घेतली जाणार असून त्याच प्रमाणे गावागावांमध्ये हिवरेबाजार पॅटर्न राबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन केले आहे तसेच लोकप्रतिनिधींनी आपापल्या गावात जागृती करून लसीकरण करून घ्यावे काही अधिकाऱ्यांनी गावे लसिकरणासाठी दत्तक घेतले आहेत.प्रशासनाचे प्रत्येक नागरिकांचे दोन्ही लसीकरण करण्याचा प्रयत्न असून असून सध्या जिल्ह्यात मुबलक साठा आहे तरी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल आहे

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular