मुंबई दि १६ मार्च
पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित
केल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवल्याने दिली आहे पोलीस उपायुक्तांना फरार घोषीत केल्याने महाराष्ट्र पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुंबई येथील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस निरीक्षक यांच्यावर मुंबादेवी येथील एका व्यवसायिकांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना अटक करण्यात आली असून या तीन अधिकाऱ्यांवर खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल केला होता