अहमदनगर दि १६ मार्च
चितळेरोड वरील नेहरु मार्केट अस्तित्वात होता परंतू तत्कालिन आयुक्त संजय काकडे काही कारण नसताना बुलडोझरच्या सहाय्याने संपुर्ण मार्केट उद्ध्वस्त केलेले आहे. त्यानंतर महानगरपालिकेने बी.ओ.टी. तत्त्वावर मार्केटचे बांधकाम करणेबाबत जाहिरात प्रसिध्द करुन निविदा मागविण्यात आल्या होत्या मात्र ५० पट कमीने दराची निविदा दाखल झाल्याने मनपाचे नुकसान होऊ नये म्हणून संजय झिंजे यांनी न्यायालयात धाव घेतली होती
न्यायालयासमोर मनपाने असे सांगितले होते की, सदर भुखंडाचे विकसित करण्याचे काम १ वर्षाच्या आत करु परंतु गेल्या १० ते १२ वर्षांपासुन सदरचा भुखंड हा रिकामा पडला असल्याने महानगरपालिकेचे लाखो – करोडोंचे आर्थिक नुकसान झालेले आहे.
त्या मुळे आता महानगर पालिकेने नेहरू मार्केट जागेवरील इमारतीचे काम विकसित करण्यासाठी महानगरपालिकेने वास्तुविशारदाकडून सदर बांधकामाचा आराखडा तयार करुन त्यासाठी जिल्हा नियोजन समिती व शासन यांच्याकडून पुरक अनुदान मिळण्याबाबत पाठपुरावा करावा व जर अनुदान कमी पडल्यास खाजगी वित्तपुरवठा (बँकिंग) कडून कर्ज उभारुन सदरचे बांधकाम करण्याचे काम तातडीने सुरु करावी अशी मागणी माजी नगरसेवक संजय झिंजे ,नगरसेवक दत्ता कावरे, आणि सामाजिक कार्यकर्ते शकिर शेख यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन केली आहे.
तसेच सदर प्रकरणी १५ दिवसांच्या आत कार्यवाही न केल्यास आपल्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.