अहमदनगर दि.५ एप्रिल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी दंड थोपटले आहेत. राज ठाकरे यांनी शिवतिर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं होत मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाही तर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी मुंबई येथे गुडीपाडवा मेळाव्यात बोलताना दिला होता.
या इशाऱ्या नंतर राज्यभरात मनसे नेत्यांनी आणि सैनिकांनी भोंगे लावून हनुमान चालीसा सुरू केल्या होत्या काही ठिकणी पोलिसांनी भोंगेही जप्त केले आहेत.
अहमदनगर मध्येही मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित संतोष वर्मा यांनी मोफत भोंगे वाटणार असल्याचं जाहीर केलं आहे.
“सरकारला अनेकदा विनंती करून सुद्धा बेकायदेशीर भोंगे बंद होत नाहीत तर आता आम्हाला यावर उपाय काढावा लागला .जोपर्यंत सरकार यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हनुमान चालीसा साठी भोंगे आम्ही मोफत वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचं” महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित संतोष वर्मा यांनी सांगितलंय असून मोफत भोंगे घेण्यासाठी संपर्क साधण्याचा आवाहन केले आहे .