Home क्राईम सहा बायकांचा दादाला पंचवीस मुलांचा संसार आणि महाराष्ट्रभरातील पंचेचाळीस गंभीर गुन्हे डोक्यावर...

सहा बायकांचा दादाला पंचवीस मुलांचा संसार आणि महाराष्ट्रभरातील पंचेचाळीस गंभीर गुन्हे डोक्यावर घेऊन फरार असलेला कुविख्यात संदीप ईश्वऱ् भोसलेला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

अहमदनगर दि ५ एप्रिल

अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील विविध शहारत ४५ गंभीर गुन्हे दाखल असलेला व तिन मोक्क्याच्या गुन्ह्यासह एकुण २६ गंभीर गून्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपी संदीप ईश्वर भोसले याला जेरबंद करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्वातील कुविख्यात अशी संदीप ईश्वऱ्या भोसलेची ओळख असून त्याला रत्नागिरी येथे अटक करण्यात आली पोलिसांनी संदीप ईश्वऱ्या भोसले ला पकडण्यासाठी तीन दिवस सापळा लावला होता शेतमजूर कमावले असा वेष परिधान करून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी संदीप ईश्वऱ्या भोसलेच्या मागावर होते जेव्हा संदीप ईश्वऱ्या भोसले पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आला तेव्हा पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच संदिप ईश्वऱ्या भोसले याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता तीन किलोमीटर पाठलाग करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर त्याला जेरबंद केले.

संदीप ईश्वऱ्या भोसले याला सहा बायका असून सुमारे पंचवीस मुलं मुली असा त्याचा संसार आहे अनेक वर्षांपासून तो फरार होता काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो पळून जाण्याचा यशस्वी झाला होता.

सादर कामगिरी जिल्हापोलिस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शकाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके सपोनि/सोमनाथ दिवटे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीवार, पोकॉ/सागर ससाणे व रणजीत जाधव यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version