अहमदनगर दि.१० डिसेंबर
अहमदनगर शहरातील रोजचे पिण्याचे पाणी काही ठिकाणी दूषित असून या बाबत महापालिकेने उपाय योजना कराव्यात असे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक हेमंत कुलकर्णी यांनी दिले आहेत. नगर शहरातील तेरा टक्के पाणी नमुने दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल आला असून याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील प्रयोग शाळेने दोन महिन्यांपूर्वी पाण्याचे नमुने घेतले होते. हे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याबाबत प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात आली या पाण्याचा धक्कादायक अहवाल आला असून.
शहरातील 13 टक्के पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहे. या दूषित पाण्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा असंही प्रयोगशाळेने महापालिकेला कळविले आहे. तर महापालिकेने शहरातील पाण्याची टाक्यांची स्वच्छता केली असून ज्या ठिकाणी दूषित पाणी येत होते त्या ठिकाणी आता स्वच्छ पाणी येत असल्याचं महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते यांनी सांगितले आहे.