अहमदनगर दि.९
अहमदनगर एमआयडीसी मधील सन फार्मा कंपनीमध्ये बुधवारी रात्री आग लागून एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला होता या घटनेनंतर आज महाराष्ट्र राज्याचे कामगारराज्य मंत्री बच्चू कडू यांनी सन फार्मा कंपनी मध्ये घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की या घटनेला ज्या कोणी यंत्रणा दोषी असेल त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश त्यांनी एमआयडीसी प्राधिकरन अधिकारी स्वप्नील देशमुख यांना दिले आहेत. तसेच या पुढील काळात अशा घटना घडू नयेत म्हणून कंपनीला सक्त ताकीद द्यावी आग प्रतिबंध करण्यासाठी जेवढ्या यंत्रणा आहेत त्या बसवण्याचा उपाययोजना कराव्यात. या आगीतील घटने मध्ये कंपनीचे कर्मचारी रावसाहेब मघाडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांना दिले आहेत तसेच या घटनेची सखोल चौकशी करून उद्याच्या उद्या गुन्हे दाखल करावेत असेही त्यांनी सांगितले आहे मात्र आता चौकशीच्या नावाखाली पुन्हा एकदा वेळकाढूपणा झाला नाही तरच मृत रावसाहेब मघाडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल नाही तर शासकीय रुग्णालयातील आगी प्रकरणी सात दिवसाची चौकशी महिन्यावर झाली तरी चालूच असल्यामुळे हा चौकशीचा फार्स पुन्हा होऊ नये अशीच अपेक्षा एमआयडीसीतील कामगारांनी केली आहे