अहमदनगर प्रतिनधी
केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला कचरामुक्त शहर म्हणून थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. महापालिकेने केलेल्या अथक परिश्रमाला अखेर यश मिळाले आहे.अहमदनगर शहराला स्वच्छतेचा थ्री स्टार मिळाल्याची गुड न्यूज भेटली असून गेल्या सहा महिन्यांपूर्वी अहमदनगर शहरात केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत नगर शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छता, आरोग्य, कचरामुक्त शहरासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच घंटागाड्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम जोरात सुरू आहे कचरा कुंड्याही आल्या असून. दारोदारी घंटाघाडी फिरवुन कचरा संकलीत केला जातो. रात्री उशिरा की गोड बातमी नगरकरांना भेटली असून नगर शहराला पुन्हा एकदा ती स्टार भेटले आहे त्याबद्दल महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नगरकरांना हा आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी पुन्हा एकदा भेटली आहे