Home Uncategorized अहमदनगर महानगर पालिकेच्या ‘या’ प्रभागात पोटनिवडणुकीच्या हालचाली

अहमदनगर महानगर पालिकेच्या ‘या’ प्रभागात पोटनिवडणुकीच्या हालचाली

अहमदनगर प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या मुळे वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे प्रभाग ९ (क) मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार सात महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर शुक्रवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.१६ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल केल्या जाणार असून या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत.या यादी प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. १७ नोव्हेंबरला प्रभागाची मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान केंद्रांची यादी २२ नोव्हेंबरला प्रसिद्ध करून २३ नोव्हेंबरला मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
नगरविकास विभागाने फेब्रुवारी २०२० ला श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द केले होते.तेव्हा पासून हे पद रिक्त आहे. मागील निवडणुकी वेळी शहरातील राजकारण वेगळ्या पद्धतीचे होते मात्र आता राज्यात महाविकास आघाडी चे राज्य असून शिवसेना ,राष्ट्रवादी, आणि काँग्रेस चे राज्य आहे त्या मुळे आता या निवडणुकीत नेमकं काय चित्र असणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version